श्री.
मार्गशीर्ष वा ३ शुक्रवार शके १७१५ ता. २० दिसेंबर १७९३
विनंति विज्ञापना. हषमतजंग याचा जागीर वजीरखानाकडे सांगितली. जंगाचे जातीस भातांबरे वगैरे गांव आहेत. तेथे जंग आजपर्यंत होते. सांप्रत जंगांनीं नवाबास अर्जी व दौलास पत्र पाठविलें कीं माझी भिजास दुरुस्त नाही. याजकरितां हुकुम जाल्यास हैदराबादेस जाईन, या प्रा। पत्रें आलीं. याचा जबाव नबावांनीं पाठविला कीं तबियतीस इलाज करण्याकरिता तुम्हीं हैदराबादेस जावें. यावरून जंग भातांबर याहून निघोन छ १३ रोजीं मैलारास आले. छ १४ रोजीं तेथेंच मुक्काम जाला, आज उद्यां बेदरास येणार. शर्मुदौला यांची भेट घेऊन हैदराबादेस जाण्याचा निश्चय जाला. रा। छ १६ माहे जावल हे विज्ञापना.
श्री
मार्गशीर्ष वा ३ शुक्रवार शके १७१५ ता. २० दिसेंबर १७९३.
विनंती विज्ञापना. चेनापटणाहुन व्यंकटरामदिला यांजकडुन अखबार आली. ते सेवेसीं रा। केली आहे. राजश्री गोविंदराव भगवंत प्रविष्ट करतील. उत्तरें रवाना करण्यास आज्ञा जाली पाहिजे. रा। छ, १६ माहे जाणवल हे विज्ञापना.