Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

श्री.
कार्तिक वा। ९ बुधवार शके १७१५. ता० २७ दिसबंर १७९३.

विनंती विज्ञापना. अजिमुदौला प्रकर्णी नवाबांनीं सरकारांत पत्रें पेशज रवाना केलीं. त्यां अन्वयें व राव सिंदे यांसही पत्रें पाठविलीं. त्याचा जबाब खरीता पत्र सिदें यांजकडून आलें ते दौलांनीं नवाबास वाचून दाखविलें. मी समीप होतों. पत्रांत मारकीं “ आजिमुदौला जेथ पावेतों गेला असेल त्याची तहकीक करून हस्तगत करावा. त्यास, आजिमुदौला कोणते मार्गे गेल्याचें अद्याप समजलें नाहीं. ज्याबण्या तालुकदारास ताकिदी पाठविल्या आहेत, कीं जेथें सांपडेल तेथें अटकाऊन पाठऊन द्यावा. या बमोजाब पत्रें सर्वांस रवाना केलीं आहेत. " या प्रा मार, राजश्री कल्याणराव व बाबाराव यांच्याही अर्ज्या आंल्या, त्या हरराव यांनीं गुजराणिल्या. बाबाराव यांनीं लिहिले आहे कीं “पुणियास पोंहचुन राव सिदें याची भेट जालीं. या प्रा लिहिलें.' रा छ २२ माहे राखर हे विज्ञापना.