१ या मसविद्याचे तिसरे दफेंत असें समजण्यांत येतें की षरीकांतुन हरयेक शरीकासीं टिपुनें येक वेळ खलल करावी, अशी परवानगी यांत होती कीं पहिल्यानें येकासीं खलेल करिल, ते समंई त्या शरीकाचे पुर्ते काम जालें तरी त्याचा बदाला जरूर नाहीं ? बलकी फक्त नसियैत त्यास केली जाइल कीं असें दुसरेयानें न करी; अगर दुस-यानें करील तर चांगलें नाहीं. तेव्हां टिपुचे खलेल करण्याचे बदल्याची आपसांत शरीकामधें अहदनाम्याचे जामीनीवी बुनीयाद राहात नाहीं. यास्तव लाड बाहादुर यांनीं इबारत लिहिली ती फायद्याची हें जाहीर आहे. याज करितां तेंच बाहाल ठेवणें नकें व चांगलें.
१ सातवी दफा या मसविद्याची अशी लिहिली आहे कीं सांप्रत मोहिमेचा नक्षा करार पाबला आहे. या प्रा हे अगर मोहीम करणें पडली आणि टिपुकडुन मुलुख व किल्ले जे कांही हातास येतील ते तीन हिसे बराबर करून घ्यावे. कारण की हा तहनामा अहदनामा जामिनीचा आहे अहदनामा मोहिमेचा व चालण्याचा नाहीं. तिन्हीं सरकार येक आहेत. हर येकाची वाटणी बराबर होईल, तेव्हां यार्थाचा समय मोहीम जाल्यानंतर आहे अगर खामखां लिहिणे मंजुर असल्या ( स ) या ईबारतीनें लिहावें कीं वांटणी मुलुक वकालें वगैरे टिपुचे सुलहामधें हातास येईल तो हरयक सरकारचे सरहादेच्या नासिब पहिल्यानें टिपुवर मोहीम जाली त्या प्रा। वांटणी अमलांत मुआणावी.
Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Published in
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)