श्री.
श्रावण व. २ शुक्रवार शके १७१५.
विनंती विज्ञापना. कादरखान माजी करोडा यांजकडे नवाबांनीं सरकार खमममेटे तालुका काडोपली सुभा अमिली दाहा लक्ष रुपये ताहुदठरून सांगितला. सुखसत देऊन समागमें तीनसें स्वार व पांचसे बार जमियेस तैनात देऊन तालुकियास खान मार याची रवानगी केंली रा छ १५ मोहरम हे विज्ञापना.
श्री.
श्रावण व. २ शुक्रवार शके १७१५.
विनंती विज्ञापना, कोदल येथील जमीदार बेदर येथील किल्यांत माजी कैद करून ठेविला होता. त्यास, पाहा-यांतून रात्रीं तो निघोन पळून गेला. पाह-याचे गारदी यास मारहाण होत आहे. जमीदाराचा शोध क्रिल्यांत व पेठ के आसपास च्यार प्यार कोस लोक पाठऊन केला, परंतु सांपडला नाहीं.
रा॥ छ. १५ मोहरम हे विज्ञापना.