श्री
श्रवण व. २ शुक्रवार शके १७९३.
विनंति विज्ञापना. मध्ध्यस्तानी बोलण्यांत आणलें की अनागोंदी व हुचेंगी दुर्ग हे तालुके टिपूकडील; तेथील जमीनदाराचा हांगामा भारी, दखल नाहीं, सबब टिपुनें फौज दहा बारा हजार दोन तालुकियाचे बंदोबरतास प॥; जमीनदारासी व त्यांचे फौजेसी एक लडाइही जाली. या प्रो वर्तमान आहे ह्मणोन सांगितलें र॥ छ १५ मेहरम हे विज्ञापना.
श्री
श्रावण व. २ शुक्रवार शके ७१९३.
विनंती विज्ञापना. मध्यस्ताचे बोलण्यांत आलें कां, टिपुची चालबेआहदीची व शरारत व गरुरीची इतकी सजा जाली तथापी जात नाहीं. पहिले तख्त केलें होतें, ते तख्तावर बसावयाची मात्र बाकी होती. हाली त्या तख्तावर बसावें हा इरादा करून साअत मुकरर केली. तख्तारूढ जाल्यानंतर रोज च्यार च्यार हिंदु आणून मुसलमान करावें ही योजना केली. याप्रो वर्तमान आहे, मग काय घडते पाहावें. सारांश, पहिल्या चाली अद्याप दूर झाल्या नाहींत कोणे विसींचा भरंवसा व विश्वास मानावा असें नाहीं. याप्रो बोलले. र।। छ १५ मोहरम हे विज्ञापना.