Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

रंकाळें.

कोल्हापुरास एक मोठा तलाव आहे, त्याला रंकाळयाचा तलाव ह्मणून ह्मणतात. त्याचें कारण असें सांगतात की ह्या ठिकाणीं एक अत्यंत दरिद्री माणूस रहात होता. त्यानें कवडी कवडी भिक्षा मागून हें तळें मूळ बांधिलें. ह्या आख्यायिकेवर जर फारशी भिस्त ठेविली नाहीं, तर ह्या शब्दाची व्युत्पत्ती निराळया त-हेनें करतां येण्यासारखी आहे. कोल्हापुरास पुष्कळ तळ्यांना नावें झाडावरून पडलीं आहेत. जसें- पद्माळें वगैरे. त्याप्रमाणेंच रंकाळें शब्द हा एका जुन्या वनस्पतीवाचक शब्दाचा अपभ्रंश आहे लंकालय असा शब्द गाथासप्तशतीच्या चवथ्या शतकाच्या ११ व्या श्लोकांत आला आहे. १६ “लंका रक्षःपुरी शाखा शाकिनी कुलटासुच " लंका ह्मणजे झाडी, कुंज. ज्या तळ्याभोंवती कुंज आहेत ते लंकालय. ह्या लंक लयांत एक जुना संध्यामठ आहे. तो पन्हाळच्या भोजराजाच्या वेळेपासूनचा आहे असें ह्मणतात. व त्या मठाच्या रचनेवरून तो त्या वेळचा असावा ह्यांत संशय नाहीं.
विश्वनाथ काशीनाथ राजवाडे.