सदतीस लक्ष रुपये तुह्मांस द्यावयाचे ठरले. त्यापैकीं बारा लक्षांच्या वराता ब्राळाजी गोविंद बुंदेले व शिवराम हरी झांशीकर मामलेदार याजवर द्यावयाच्या. बाकीं पंचवीस लक्ष रुपये राहिले. त्याच्या मुदतीची याद आलाहिदा ठरेल त्याप्रमाणें एका महिन्याचे आंत खुशालचंद याची निशा दिली जाईल. येणेंप्रमाणें करार, फौज व पलटणें हुजुर चाकरीस राहातील, त्यास सरंजाम स्वदेशांत वसुली बेरजे चालवून घ्यावा ते ५००००० रुपये तुम्हांकडील एक हजार फौज दोन पलटणें हुजुर चाकरीस राहतील, त्याचे मदतखर्चास पांच लक्ष रुपयांचा सरंजाम कच्चा वसुली जमेची स्वदेशांत लाऊन दिला जाईल. येणेंप्रमाणें करार.
-----
२
९ सदरहु प्रमाणें ऐवजाची याद करून दिली.
----
२
१ बाजीरावसाहेब व आप्पासाहेब व मोरो बाबुराव फडणीस वगैरे मुत्सद्दी व सरदार शिंदे याचे कारभारी आबा चिटणीस यांणी आपल्या डे-यांत स्वयंपाक केला. तेथें भोजनास गेले. अमृतरावसाहेब वाड्यांतच होते. आषाढ शु।। ८ छ, ६ सफर सोमवार.
२ अमृतरावसाहेब याणीं भिवडी वगैरे सात लक्षांचा सरंजाम घेऊन कोकणांत भिवंडीस जावयाकरतां श्रावण शु। १ छ २९ सफरी प्रातःकाळीं वाड्यांतून निघून गेले. स्त्री सौभाग्यवति वहिनीबाई व पुत्र विनायकराव वाड्यांत होते. देखावे अमृतरावसाहेब करीत होते ते राहिले. बाजीरांवसाहेब देणें व फडणीसीची तारीख करून कारभारास सदाशिव माणकेश्वर व गोपाळराव मुनसी व बाळोजी कुंजर होते. मोरोबा फडणीस आपले घरीं असत.