११ जात मुबार केले दवलतीचा बंदोबस्त करून सर्वावर दाब व तेज असावें हें तुमचें मानस. त्यास जात मुबारकेकडून दवलतीचा बंदोबस्त होण्यास तुमची अनुकूळता पाहिजे: तशी सबाह्याभ्यांतर कायम असावी, हार कोणाचे समजाविल्यावांचून संशय घेऊन, दरम्यान कलुष तुह्मी चित्तांत आणू नये. कोणी कांहीं समजाविल्यास हुजूर विनंति करून स्वच्छता वरचेवर करून घेत जावी. प्रांतांतील तुह्मी उपद्रव व पत्रें व चिट्टया मसाले मना केले ह्मणजे दाब व तेज तुमचे मनोदयानुरुप निदंर्शनास येईल,
स्वामींनीं जातीनिशीं दवलतीस आळा घालोन बंदोबस्त करावा हीच इच्छा. त्याप्रमाणें स्वामीकंरितां सेवकाकडून कोणतेही प्रतिकूळ पडणार नाहीं. कोणाचे समजाविल्यावरून स्वागीचे चित्तांत व सेवकाचे चित्तांत संशय येऊं नये. राजकारणसंबंधी व सल्लमसलतीचा दाखला पहिलेपासून सेवकाकडे घ्यावयाची चाल आहे. त्याप्रमाणें सरकारांतून आज्ञा होत नाहीं. परस्परें कोणाचें सांगितल्यावरून चित्तांत संशय आल्यास, सरकारांतून आज्ञा होत जावी. इकडूनही विनंति होईल. संशय दोन्हीकडेही राहूं नये. ज्यांत स्वामीचा दाब तेज प्रतापाची वृद्धि होय तेच करण्यांत येईल येणेंप्रमाणें.
---
११ करार.
१ शिंदे यांस ऐवज द्यावयाचा ठरावून बाजीरावसाहेब याणी कराराची याद करून दिली. छ. १७ फर आज्ञा. मास ७
१ फौजेचे खर्चाबद्दल रुपये,
३७०००००
२५०००००
तूर्त नक्त रुपये सावकारी निशा.
१२०००००
वराता हिंदुस्थानांत बाळाजी गोविंद बुंदेले व शिवराम हरी झांशीवाले यांजवर दावा.
-----------
३७०००००
Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Published in
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)