Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
श्री.
स्मरण. शके १६७० विभवनामसंवछरे, माघ वद्य १३ शुक्रवार, ते दिवशीं असोजी बिन गंगाजी पा। झांजे मोकदम व ढोर व समस्त दाहीजण, मौजे वहिरे, ता माडोंगण, प्रा। कडेवळित, सरकार अहमदनगर, यांसी खंडोजी बिन हणवंतराऊ मोरे पाटील, मोकदम, मौजे शिंदेगव्हाण, ता। खेड, सा। जुनर, सु॥ तिसा अर्बैन मया अलफ, सन हजार ११५८, फारखती लेहून दिल्ही आहे कीं:–आमच्या वडिलाचें कर्ज तुमच्या वडिलाकडे रु॥ १००० एक हजार होतें. त्याचा तगादा श्रीमंत राजश्री पंतप्रधान यांच्या विद्यमानें केला. त्याजवरून लिगाड वारलें. मारफत राजश्री जानबा निंबाळकर यांचे कारकून राजश्री गोविंदराऊ मलार खिजमतराऊ यांणीं चुकविलें. सबब कीं, वाहीरे जानबाची जाहागीर त्यांणीं वारले. फारखती मेरियापासून सदरहू वाहिरेयाच्या पाटिलाच्या नांवें घेतली. त्याजवर साक्ष देशमुखांची उभयतांची घातली. खंडोजी मेरियास पुसोन घातली. चैत्र शुद्ध १५ बुधवार शके १६७१.