Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
श्री.
स्मरण. इ॥ चैत्र शुद्ध १ मंदवार शके १६७० विभवनामसंवछरे, सन हजार ११५७, सु॥ समान अर्बैन मया व अलफ. रोजमजकुरीं प्रतिपदा प्रातः काळीं दोन घटका होती.
शुद्ध २ रविवारीं साखराबाई वागचवरी लाडूबाई यांची मातुश्री कोरेगांउ भिवर येथें वारली असे, अवशीचे रात्रीं प्रहर सवाप्रहर रात्र ज़ाली होती. १
शुद्ध ३ सह चतोर्थी सोमवारी बाजीभट शाळग्राम पुणियांत वारले. पावणेदोन प्रहर रात्र उरली तेसमईं वारले. दिवस उगवला. सोमवार. त्यांची मातुश्री व भाऊ वगैरे महायात्रेस गेलीं होतीं तीं रविवारीं आलीं. रात्री बाजीबावा वारले. १