Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)

[ ५९५ ]

श्रीशंकर शक १६४६ फाल्गुन वद्य १४

श्रीराजा शाहु
चरणि तत्पर
संताजी भोसले
नीरंतर

छ मा। अनाम नंदलाल मंडलोई व कानगी पा। इंदूर प्रांत माळवे यासि

सवाई संताजी भोसले सु॥ खमस अशरीन मया व अलफ. राजेश्री गोपाळपंत व आपाजीपंत. माहाराणाकडे उदेपुरास कांहीं नाजुक कार्यभागप्रसंगामुळें रवाना केले आहेती. त्यास, हे तुह्माजवळ येतील. ऐशास, आमच्या नजरेबाबत घोडा एक व वस्त्रें तुह्मांकडील याचे स्वाधीन करून यास पलीकडे मार्गस्त करणें. या कार्यास विलंब न लावणें. विलंबाखाले घातलें आणि कार्यास अंतर पडिलें मणजे जवाब तुह्मास करणें लागेल. हें पष्ट समजोन लिहिल्याप्रमाणें वर्तणूक करणें. छ २७ जमादिलाखर.

मोर्तब
सुद