Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)

[ ५४० ]

श्री.

याचें उत्तर गावावर हल्ला चढोन लोक गावांत उतरले. तेव्हां त्याजकडील लोक उपलाणी घोड्यावर बसोन, हत्यार- धरून, गल्या रोखोन, उभे राहिले. व देवूळवाड्यांतील लोक गोळ्या मारूं लागले. ते समयीं आह्मांकडील लोकांनी गोळ्यांनीं सडकलें. तेव्हां देवडी सोडून देऊन, वाड्यांत जाऊन, गोळ्या मारूं लागले. तेथें आह्मांकडील लोक जखमी व ठार जाहले. उपरांत, रोहिले वगैरे लोकांनी निकड करून वाड्यांत शिरले. तेथें तरवार चालोन दोहकडील माणसे ठार न जखमी जाली. त्याच घालमेलींत मशारनिला * देवळांत मारला गेला. बाहेर आणून अथवा वळखून मारिला, ऐसें जालें नाहीं. हत्यार सोडून देवळांत लपाला किंवा लढत होता ही माहीतगारी आपणांस नाहीं, व कोणी मारला हें ठिकाण आजपर्यंत लागलें नाहीं.