Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)

[ ४६२ ]

श्री.

राजश्री मल्हारजी होळकर सुवेदार व राजश्री जयाजी सिंदे सुबेदार गोसावी यांसीः--

छ सकलगुणालंकरण अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य
स्नो। बापूजी माहादेव अनेक आशीर्वाद विनंति उपरि येथील कुशल ता। छ २५ माहे जिल्हेज मुकाम इंद्रप्रस्थ जाणून स्वकुशल लिहित असिलें पाहिजे. विशेष. माहाराजे रामसिंग यांजकडून जगन्नाथ पुरोहित व राज़ा सावंतसिंग आपणांसमीप आले आहेत. कितेक कामकाजानिमित्य विनंति करतील, ते मान्य करावी. थोड्या गोष्टीनें व सिष्टाचारानें काम होत असलियां कां चुकावें ? व आपण केव्हां चुकतील ? पाचसातशे स्वार व एखादा नामी सरदार यांच्या समागमें द्यावा. हेच आपलें काम बजाऊन घेतील. तमाम रजपुत बखतसिंगाकडोन फुटोन याजकडे आले व येतात. व आपल्यास सहजात यश येतें, याजकरितां आपणांस लिहिलें असे. करणार आपण समर्थ आहेत * बहुत काय लिहिणें ? कृपालोभ दुणावते. हे विनंति