Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ४१३ ]
शके १६८२ फाल्गुन वद्य.
पुरवणी राजश्री सुमानजी जाधवराव बाबा गोसावी यांसः---
॥ छ विनंति उपरि श्रीमत् सौ। पार्वतीबाई, व नाना पुरंधरे, व दमानी गा।, नारो शंकर, मिळोन व मल्हाररायाकडील जमाव सदरहू लिहिलेप्रों।, चाळीस हजार जमा जाला होता. गिलजियांवर व नजीबखानावर सलावत पडली होती. वकील सलुखास येत होते. श्रीमंत राजश्री नानासाहेब शिरोंजेवरतीं होते. खिचिवाडियांत राजश्री जानोजी भोंसले, व गोपाळ गोविंद, पंधरा हजार फौज होती. मागें श्रीमंत दादासाहेब देशीहून येतात. सलाबत पडिली होती. परंतु लोकांस रोजमुरा न मिळला. ऐवज श्रीमंतानीं न पटविला. याजस्तव, श्रीमत् सौ। पार्वतीबाई, व नाना पुरंधरे, व नारो शंकर गालियेरीकडून उभेरस्तां सिपरी कोलारसाहूनच आले. कबिले त्या प्रांताकडील लोकांचे आले. एणेकरून दुंडी जाली. आपले महाल रहलचा सिवार गहूं, हरभरे, सपरी कोल्हारस ठिकाणीं लागले. तहसील बंद जाली. पूर्वी दक्षणेहून बाबोजी नाईक, सदाशिव रामचंद्र, व त्रिंबक शिवदेव पंधरा हजार फौज गालियेरीकडे गेली. त्याणीं बखरवा, समडी, दांडोगर, कोल्हरस, सिपरी, प्रांत सिवार चारीत गेले. कोणास कोणी ताकीद करीना. आह्मी बहुत रदबदल केली. ते साफ ह्मणतात कीं, तुह्मांस आशा अद्याप या प्रांती आहे की काय ? अगदीं मुलुख खराब केला आहे. रुपयेस ठिकाण नाहीं. खासा याजला मागोन राजश्री त्रिंबकजी हंडे, धोंडोबा तात्या येथें आणिले आहेत. सर्व वर्तमान कचे पायमल्लीचें खराबीचें त्यास विदित केलें आहे. आपण तो अठीचे रुपये विष्णोपंत गजरियास देविला, एकोत्रा व्याज त्याचें. तुमचें आमचें दीडोत्र्याप्रों। व्याज पडलें. पैका न मिळे तेव्हां व्याजकसर रु॥ ६०० पडले. हजार रुपये अठीच्या भरंवसियास पडला. पंचमेल रु॥ घ्यावेयाचा तह आमचा तुमचा असोन, अठीचा भरणा करविला. लाख रु॥स हजार रुपये बट्टा पडला. सोळाशें रुपये जातीवरी पडले. गालिइरीस आह्मीं पंधरा हजार रुपये खाशीयास रोखा केली. तरी दिल्हे. विठ्ठलराव शिवदेव यांचा हवाला, अकरा हजारांचा, घेतला. खाशियांनी खत लेहून त्यास दिल्हें. सवा लक्ष रुपये रोख पुणियांत चिरंजीव रंगोबानें भरणा करून दिल्हे. हफ्त, फितूर, सुलता, जनगी सर्व प्राप्त जाले ! सावकारास रुपया पावला नाहीं. एकंदर पस्तीस हजार वसूल जाला तो दगा प्राप्त जाला. मातबर लोक, सरदार चरणाखालीं आले. अगदीं घर सुटका होता. परंतु तेसमंई हिंमत धरून शीपरीचें ठाणें साडेतीनसे बरकंदाज ठेवून रक्षिलें. झरी, सेसै, बुढ्ढे डोंगरी, बराइ, गाजीगड, जागा, आपल्या रक्षिल्या. हा काळवर जागे रक्षिले. सुपारेकर कमाविसदार यांचे हाल, व रणोदकर याचे, आणखी मामलेदाराचे, झांसीकर राजश्री बाबूराव कोनेर यांचे हाल काय जाले, त्याचा विस्तार कोठवर ल्याहावा ? राजश्री बाबूराव कोनेर यांचे भाऊ शेवडियावर पडले. याच काळांत धीर धरून आपले जागे रक्षिले. नरवरकरांनी खासियांच्या खबरीं लटक्या कंड्या उठोन दगा केला होता. ठीक ! कुवरपूर घेतलें होतें, तेंही सोडविलें. परंतु ठिळियांत यादवराव होता, त्याचे कबिले धरिले. नरवरकर यांजकडील मदनसिंग यानें साडेआठ हजार रु॥चीं मेवासी घोडी, बाब, गल्ला, वस्त, भाव मिळोन लुटिली. त्याचे ठिकाण लागों देत नाहीत. याप्रों। घोरांत असो. आपण तो पत्र पाठवून आमचा परामृष करणें सोडिला, हे उचित नाहीं. याउपरि ऐसें न करावें. चिरंजीव रंगोबाचे जातीवरी सोळाशे रुपये व्याजबट्टा पडला. त्याची निरगत हिशेबीकितेबी करणार आपण समर्थच आहेत. आपले शेवेसी अंतर किमपि केलें नाहीं. गुदस्तांच मात्र पेंच घालोन सोळाशे रुपये नख्त जातीवरी पडिली. त्याचें निराकारण करणार आपल्याखेरीज कोण असे ? सर्व आश्रा भरवंसा आहे. काशीहून येतेसमईं येथें कार्यभाग विस्कलित जाणोंन, राहेल तो रु॥ घोरांत पडला. असो. सर्व आमची चिंता साहेबास असावी. पूर्वीपासून पदरचे असो. कृपा असो दिल्ही पा।. पत्राचें उत्तर पाठविलें पाहिजे. खासियासी आमचेविशीं बहुत प्रकारें ल्याहावें. हे विनंति.