Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)

[ ३५७ ]

श्री
शके १६७७.

पु॥ चिरंजीव राजश्री दादा यासि.
आसीर्वाद उपरी. तुह्मी पत्र पाठविलें, तें पावलें. वजिराचा शुका नागरमलाचे नावें पाठविला तोहि पावला. त्यास, काल शुकुरवारीं नवाब बहादुरासी आमची अवग्र दोन प्रहरपर्यंत रदबदल जाहाली. तात्पर्यार्थ हाच जेः सतर लाख रुपये आह्मां घेऊं द्यावे. व सलाबतजंगास न्याबत देऊं द्यावी. आह्मी विनंति केली जेः हाजरत फिरदोस आरामगाहाचे वेळेस सवाई जेसिंग कैलासवासी जालियावर राणानीं पातशाहास पैगाम केला जे, क्रोड रुपये आह्मी देतों. माधोसिंगास राज्य अमरेंच होय. त्यावरून पातशाहांणीं कबूल करून इतमाहादौला दोहीद यासी मसलहत पुसिली. त्यास इतमाहुद्दौलांहीं हाच अर्ज केला. दोन हाजरतचा मी एक + + + हें काम बहुत उमदें. वगैरे. त्यास जितके + + + चे उमदे असतील तितक्यांसहि हाजूर बोलावून मसलहत पुसावयाची आहे. + + + आसफज्याहा तो दूर आहे. त्यास लिहून पाठवावें. व सफदरजंगबहादूर, व उमदुनमुलुख यांसीं हाजूर बोलवावें. त्यावरून उभयतांस हाजूर बो + + + डेरे निघावयाची देखील तयारी जाहाली. इत्कियांत पंतप्रधानांहीं ईस्वरसिंगासच राज्य द्यावें, ह्मणोन तजवीज लिहिली. तेव्हां सफदरजंगबहादुरांहीं व उमदुनमुलुकांहीं व वजीरुनमुलुकांहीं व यतमाहुदौलांहीं हेच मसलहत दिली जेः क्रोड रु॥ न घेऊन माधोसिंगास राज्य न द्यावें ; व ईश्वरसिंगासच द्यावें; हे विनंति पातशाहास केली. त्याचप्रमाणें पातशाहांणीं मंजूर केलें. व दुसरी तकसीर हे जे : कमरुदीखानास लाहोरमुलतानची सुबेदारी सरफराज केली. यावरी, येहेंयाखां व फखेरी यांणी क्रोड रुपये देऊं करून सुबेदारीची दरखास केली असतां, सफदरजंगबहादुरांहीं व उमदुनमुलुकांहीं रु॥ घ्यावयाची सलहा न दिधली. तुह्मी ह्मणाल, हे कमरुदीखानाची ल्यायेकत राखीत नाहीत; तर निजामनमुलुक, इतनादौले, मोहीमुलुक, इत्की मिळून कमरुदीखानाची ल्यायेकत राखितात. हेही एकीकडे. जर तुह्मांस करणें होतें, तरी तुह्मी पंतप्रधानाच्या इजायातची तसलीमात त्यांकडून कां करविली ? व आह्मांस दक्षनचे मुख्तारीचा फर्मान कां दिधला ? व आह्मांकडून दक्षिणेची तसलीमात कां करविली ? हागोयाजामा पंतप्रधानाचा काढूं ह्मणता; असो. चित्तास येईल तें करा. निजामनमुलुकांहीं आह्मांस सुबेदारी घेतली, तेवेळेस क्रोड रुपये कबूल करून मोहरीफर्द पंतप्रधानानाजवळ पाठविला. त्यांसही क्रोड रु॥ निजाममुलुकाकडून देववावे; अथवा आपन द्यावे; अथवा, आह्मी तुमचेही क्रोड रुपये कबूल करितों. त्यावरून + + + न होऊन + + + + ने गुजरातची सुबेदारी तुह्मी घ्या, आणि तेव्हली भर्द काढून आणा. आह्मी ह्मटलें जें: गुजरात तो आमची आहेच. तुह्मी आह्मांस आजि का + + + + + याचाही देसीं तुमचा वसूल करा. आह्मीही मुबलक मेळवूं. त्यावरून ज + + रुपयांसाठी लोळण घालितात, व वजिरासही लिहितात. त्यास ईश्वरइच्छेनें लौकरच खबर येते जेः परिमारें भाऊ भाऊ सलाबतजंग बिसालतजंग झगडून मरतात. जो कोणी सुबेदारी पंतप्रधानाचे अखताराची काढू ह्मणेल त्याचें पाठीवाटें काळीज निघेल. जुगलकिसोरामाकूल करणें : जे कां बंगालियावर कंबख्ती आणिता, बजिनस त्याच्या मोहरीरी नकला पातशहांनीं आमचे हवालां केल्या. ते पंतप्रधानाकडे पाठवितों. तुह्मांकडे, नकल पाठविली असे. त्याजवरून कळेल. हें त्यास बनिनस दाखऊन या गोष्टीपासून हात उचला ह्मणोन सांगणें.