Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ३५३ ]
श्री शके १६७७ पौष वद्य ३०,
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री गोपाळ महादेव गोसांवी यांसिः--
सेवक पुरुषोत्तम महादेव व देवराऊ महादेव नमस्कार उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय लिहीत जाणें. विशेष. तुमचे तैनातीस पेशजी साहेबखां चाळिसा स्वारानसीं ठेविला आहे. +++ पंचवीस स्वार ठेऊन पंधरा स्वार +++ देऊन तसिया घ्यावयासी पाठवणें. तीर्थरु॥ दादासाहेबीं महमद वासल वगैरे तुमचे तैनातीस ठेविले. त्यांसहि बरतरफ आजचे तारिखेपासून केले. हाजरी वसूल देऊन पाठविलें पाहिजे. तुह्मांस जे फौज व लोक लागतील तरी रा। भाऊ फौजसहर्वतमान त्या प्रांतास फौ + + + वर ठेविलेंच आहे. काम पडलिया बोलावून + + + मलिदा शंभरी मणांचा कबूल केला आहे. त्यांत आह्मी दाह मणा मलिदा करविला होता. बाकी नवदी मणांचा राहिला आहे. ते रोज दररोज करून हिशेब लिहिणें. माहाली मुजरा पडतील. जाणिजे. छ २८ माहे रा।खर, सु॥ सित खमसैन मया अलफ. बहुत * काय लिहिणें !
मोर्तब
सुद.