Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)

[ १२८ ]

श्री. शके १६६० पौष शु॥ ११.

राजश्री पिलाजी जाधवराव गोसावी यांसिः-

आशीर्वाद उपरि. सुमुहूर्ते आपांचा डेरा बाहेर दिल्हा; उत्तम केलें. याउपरि लोकसुध्दां यांचे जाणें त्वरेनें तेथें होय, करावें. आपण सत्वर मागून लोकांची रवानगी करावी. हे तेथें जातील; जागा पाहातील; वरचेवर वर्तमान लिहून पाठवीतील; मग जरूरच जाहले, तरी तुह्मांस पाठविणें तरी पाठवूं. सांप्रत शरीरीं तुमचे स्वस्थता नाहीं, यास्तव तुह्मी न जाणें. आपांस सत्वर रवाना करणें. छ. ९ सवाल. + बहुत काय लिहिणें ? हे आशीर्वाद.