Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ १२३ ]
श्री. शके १६६० श्रावण शुद्ध ७
वेदमूर्ति राजश्री माहादेवभट्ट स्वामी गोसावी यांसिः-
सेवक बाजीराउ बल्लाळ प्रधान नमस्कार उपरि येथील कुशल जाणून तुह्मी आपणाकडील कुशल लिहित जाणें. विशेष. राजश्री राणोजीसिंदे व राजश्री रामचंद्र मल्हार आले. यांणीं तुमचे कष्टमेहनतीचा मजकूर विस्तारें सांगितला, त्यावरून संतोष वाटला. ऐसियास, तुह्मीं कामकाजास जपून कार्यभाग करून दाखविला, पुढेंही न चुका, ऐसा भरोसा आहे. कितेक कार्यभागाचा मजकूर हालींही मा।रनिलेंनीं तुह्मांस लिहिला आहे; तदनुरूप करून वर्तमान लिहीत जाणें. तुमच्या वर्षासनाविशीं उभयतांनीं विनंति केली. त्यावरून तुमचे गुदस्ताचे रुपये शंभर व सालमजकूरचे शंभर एकूण दोनसे रुपये देविले आहेत. तुह्मांस पावतील. सारांश सर्व प्रकारें तुमचें अवश्यक आहे. हरएकविसीं समाधान रक्षून कामकाज करीत जाणें. जाणिजे. छ० ७ रबिलाखर. बहुत काय लिहिणें ?
लेखन
सीमा.