Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)

[ ६२ ] पु॥ १०

श्री.

शके १६५३.

सेवेसी विनंति. सासवडचे खंडणीविसीं पत्र पाठविलें तें पावलें. तेंच पत्र नारो आपीजी यांस आज्ञेप्रमाणें दाखविलें. त्याजवरून त्यांनी वेगळे वाटनें च्यार गोष्टी सांगितल्या जे, नानाच्या. आबाच्या लिहिल्यापेक्षां दुसरा प्रकार अधिकोत्तर काय आहे ? परंतु वरकड गांव आमचे निसबतीस आहेत; त्या गांवांवरी दस्तापेक्षां पावणेदुणी चढली. सासवड तनख्याप्रमाणेंहि रुपये देईना. प्रस्तुत दरबारचा प्रकार कसा हें सर्व ते जाणतात. च्यार रुपये त्याचे भिडेनें सोडले, तरी माझे पदरीचे जात नाहींत; अगर, घेतले तरी मजकडेच येत नाहींत. परंतु प्रस्तुतच्या रंगासारखें सर्व गांवांप्रो। निटांत दिसेल, तें करावें, हेंच उचित. त्याचे भिडेनें पांचशे रुपये सोडतों आणि करार करितों, याप्रो बोलिले. आह्मी च्यार रदबदलीच्या गोष्टी सांगणें त्या सांगितल्या; परंतु, त्यांनी थोरल्या डौलाच्या बोलण्यावरी घातलें. तेव्हां काय होणें ? याप्रों। नानांनीं करार केला, त्याची नकल अलाहिदा पाठविली आहे, ते पाहावी. मान्य जालिया आज्ञा करावी, ह्मणजे त्याप्रों। खंडणी कौल करूं. बेजमा वसूल करून घेऊन येतों. सेवेसीं श्रुत होय. हे विज्ञापना.