Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ६१ ]
पु॥ ११४ श्री. १६१३.
राजश्री सखोबा स्वामींसः-- विनंति उपरि. गांवचे वाणी सारे येथें आले. गुजर बाहेर काढणें ह्मणून फारच आग्रह केला; आणि पूर्वीचा करारहि आहे. त्यांस गुजरास बाहेर काढणें ह्मणून चिटी दिली. त्यास, त्यानें दोन महिने पावेतों राहावें; उधार केला आहे ते उगवावा; दुकान अथवा नवा उदीम करूं नये. दो महिन्यानंतरी गांवांतून बाहेर काढणें. यांत गुंता नाहीं. तूर्त प्रज्यनाचे ( पावसाचे ) दिवस आहेत. यास्तव समजूत काढणें. येथवर बोभाटा दोघांचा न ये तें करणें. हे विनंति.