Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)

वैशाख शुद्ध ८ शुक्रवारीं संध्याकाळीं श्रीमंत राजश्री बाळाजी पंडित श्रीबनेश्वरास गेले होते. ते रोजमजकुरीं आले. १

वैशाख शुद्ध ९ मंदवारी रात्री राजश्री बाळाजीपंत मांडवगणे याचे लेकीचें लग्न जालें. शरीरसंबंध राजश्री नारो रघुनाथ वैद्य यांच्या पुत्रास दिली. १

वैशाख शुद्ध ११ सोमवारी राजश्री सेनाखासखेल श्रीमंत राजश्री पंतप्रधान यांचे भेटीस आले. त्याजला सामोरे राजश्री विश्वासराऊ व राजश्री त्रिंबकराऊ मामा ऐसे गेले होते. १

वैशाख शुद्ध १२ मंगळवारी मधरात्रीं राजश्री विश्वासराऊ, राजश्री जानोजी निंबाळकर यांच्या घरास लग्नास गेले. बरोबर मोरो बल्लाळ व ( पुढें कोरी जागा )

वैशाख शुद्ध १४ सह पूर्णीमा गुरुवारीं गणेशभट वेव्हारे याजला प्रथिकाळीं देवआज्ञा जाली. १

वैशाख वद्य ४ मंगळवार प्रधानपंत थेवरास गेले. मु॥ केला. दुसरे रोजीं येतेसमई कोलवडीस कृष्णाजीपंताचे घरी जाऊन वस्त्रें घेऊन सा घटका रात्री घरास आले. १

वद्य षष्ठी गुरुवारी, राजश्री गोविंदराऊ बिन्न अडबोजी नाईक शितोळे देशमूख यानीं आपली लेक तान्हाजी धायबर याजला दिल्ही. तिची मागणी रोजमजकुरी घातली. १

छ १३ जाखर वैशाख शुद्ध १५ शुक्रवारी खबर आली की, राजश्री रामदासपंत मोंगलाचा दिवाण याजला, जमातदाराची तबल चहडली ते मागावयास गेला, आहे नाहीं ह्मटलें ह्मणून त्यानें त्याजला मारिलें. ऐशी खबर आली. छ १८ जा। खरी वैशाख वद्य ५ बुधवारी पुणियास खबर आली.

वैशाख वद्य ६ गुरुवारी सुभानजी बिन्न अप्पाजी जाधव याचे कन्येचें बाळीबाईचें लग्न गोरख जालें. शरीरसंबंध राजश्री तुकोजी पवार यासी केला. श्रीमंत राजश्री पंतप्रधान व राजश्री भाऊ व राजश्री दादा व सर्व बायकामुले लग्नास आणिली. समारंभ उत्तम प्रकारें केला. श्रीमंतास दोन घोडीं व एक हत्ती नजर केली. वस्त्रें त्याच्याबरोबरील सर्वा लोकांस दिल्हीं. द्वादशीस भोजनोत्तर श्रीमंत माघारे गेले. १