Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
शके १६७४ १ प्रजापतिनामसंवछरे चैत्र शुद्ध.
चैत्र शुद्ध ४ रविवारीं मोरो खंडेराऊ देशपांडे, प्रा। पुणें, यांची सून लवळेकर यांची लेक इजला लवळियांमध्ये फोड्या निघोन रोजमजकुरीं देवआज्ञा जाली, दुसरे दिवशीं देशपांडियास वर्तमान कळलें, तेव्हां सुतक पडिलें. परंतु ब्राह्मणभोजन व कथा करीत असेत. आगांतुक ब्राह्मण भोजनास जात असेत. ग्रामस्त, मातबर ब्राह्मण कोन्ही भोजनास गेले नाहींत, याप्रा। केलें.
चैत्र शुद्ध १५ बुधवारीं श्रीमंत राजश्री बाळाजी पंडित प्रधान व राजश्री सदाशिवपंतभाऊ ऐसें विसा घटका दिवसाउपरांतिक पुणियास आले. विसापूर व लोहगड पाहून मग आले.
चैत्र वद्य तृतिया मंदवासरे ते दिवशीं प्राथकाळचा घटकाभर दिवस आला ते समई चिरंजीव सोभाग्यवती ठमाबाई प्रसूत जाली. कन्या जाली. तिचें नांव ताराई. स्वातीनक्षत्र, चरण चौथा, र्हुदयीं नक्षत्र पडिलें आहे.
चैत्र वद्य १ सोमवार ते दिवशीं राजश्री आबाजी चिंतामण हुडपसरकर कुलकर्णी याचे हवाला कागद, त्यानीं मिरासशेत मौजे हड़पसर येथे करून घेतलें आहे, त्याचा चकनामा ठेवावयास दिल्हा होता तो मागोव्यास आले. तो त्याचे हवाली केला, गु॥ आकोपंत पिंपळगांवकर कुलकर्णी.
चैत्र वद्य षष्ठी मंगळवारी राजश्री साबाजी नाईक निंबाळकर याजला मेजमानी मातुश्री लाडूबाई देशमुख यानी केली. कारकून आपल्या घरास भोजनास आले. याप्रा। केली. वस्त्रेंहि अगत्याअगत्य दिल्हीं. १
चैत्र वद्य आमावाशेस राजश्री खंडेराऊ निंबाळकर याजला मातुश्री लाडूबाई देशमुख यानीं मेजमानी केली. १
वैशाख शुद्ध द्वितिया रविवारी संध्याकाळी चार घटका दिवस असतां श्रीमंत राजश्री बाळाजी पंडित प्रधान व राजश्री भाऊ ऐसे उभयतां मातुश्री उमाबाई व अंबिकाबाई दाभाडी याजकड़े आवजी कवाडयाच्या वाडियांत आले. दोनेक घटका होते. उपरांतिक गेले. काय मसलतीस गेले होते हें कळेना. १