[ ५८७ ]
श्री.
शक १६४२ भाद्रपद वद्य ६
राजश्री राव नंदलाल मंडलोई पा। इंदूर् गोसावी यासि.
छ अखंडितलक्षुमीअलंकृत राजमान्य स्नो। मलारराउ होळकर व दसोजी वाघ दंडवत. सु॥ इहिदे अशरीन मया व अलफ. आह्माकारणे डेरा तयार करून पाठवून देणे. नारोपंत सांगतील त्याप्रमाणें सिवून पाठवून देणें. हयगयी न करणे. जाणिजे. छ १९ जिल्काद. हे विनंति.
मोर्तबसुद
श्री मार्तंड-
चरणीं तत्पर
बारगळ निरंतर