[ ५८६ ]
श्री.
दंडवत विनंति उपरि. तुह्मी पत्र पाठविलें, लिहिलें कीं, तळावर प्रहरभर मुकाम करणें, ह्मणौन लिहिलें. त्यावरून, प्रहर सा घटका सडे तळावर राहातों तों तुह्मी ताबडतोब येणें. छ १८ जिल्हेज. हे विनंति.
मंडलोईकारणें तळावरि राहणें ह्मणोन लिहिलें होतें. यास्तव पाहारभर राहिलों आहों. तरी तुह्मी लवकर येणें. पुढें सांगोन आह्मास निरोप पाठवणें. हे विनंति. लेखनसीमा.