[ ५८५ ]
श्री. शक १६४२ वैशाख शु॥ १३
राजश्री राऊ नंदालाल मंडलोई पा। इंदूर गोसावी यांसि.
छ अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नेहाकित मल्हारराऊ होळकर रामराम येथील कुशल जाणोन स्वकीय लिहीत जाणे. परगणे बडवाई येथील राजियाचा आणि आमचा बदसलूख जाला. तो कुल प्रसंग तुह्मास ठावका आहे. त्याचें पारपत्य जें कर्तव्य तें उत्तम प्रकारें करून. परंतु तुह्मीहि मातबर आणि त्यासंनिध आहात. एक वेळ त्यास बरवे प्रकारे माकुल करून कांहीं विचारास येत असतील तर पाहाणे. नाहींतर आपण तों पारपत्यास चुकत नाही. इतकियाउपरि त्यांणीं आपला परिणाम उत्तम लागेल तो अर्थ अर्थिल्यांत उत्तम. बहुत काय लिहिणे ? छ ११ माहे रजब.
ॅ मोर्तबसुद
श्रीमार्तंडचरणी
तत्पर । बारगळ
रघोजी नीरंतर