[ ५८२ ]
श्री. शके १६४८ ज्येष्ठ बहुल ८.
स्वस्तिश्री राज्याभिषेक शके ५३ पराभव संवत्सरे ज्येष्ठ बहुल अष्टमी मंदवासरे क्षत्रियकुलावतंस श्री राजा शाहूछत्रपति स्वामी यांणी राजश्री सिदोजी पोळ यासि आज्ञा केली ऐसी जेः- वेदमूर्ति त्रिंबकाचार्य पंढरपुरकर गलगलेयास गेले होते. तिकडून पंढरपुरास येतां मार्गी बसापा गौडा मौजे मळाबाद याणें लुटिलें, वस्तभाव घेतली, ब्राह्मण यास श्रमी केलें. तरी तुह्मी त्यास वरजोर ताकीद करून वेदमूर्तिपासीं वस्तभावेची यादी आहे त्याप्रमाणें जराबजरा यांचे पदरी घालवणें. एविसी गै न करणें. जाणिजे. बहुत काय लिहिणें.
मर्या
देयं रा
जते