[ ५८१ ]
श्री.
पु॥ राजश्री बापूजी माहादेव व दामोधर माहादेव गोसावी यांसीः--
विनंति उपरि. राजेईश्वरसिंग बाहेर निघोन दोन कोस मुक्काम जाला. राजश्री गंगाधरपंत फौजेसहित भोवताले होतेच. आह्मीही मौजे बगरापासून तीन कोस लष्करचा मुकाम करवून सेनासहवर्तमान दुसरे दिवसी तयार होऊन गेलों. त्यास कछवियाचेंही कूच जालें. रवदडोन अदकोस चमळा. तेथें त्यांचा आमचा मुकाबला जाला. सरळ पडून चालत होता तो अराब भोवताले देऊन उभा राहिला, चालावयास हिमत नसून. ते समई उजवे बाजूस आपली फौज उठोन सेखावत नरोके होते तेथें घाव उत्तम जाला. सिवसिंगेसे खावत याजला जखमा लागल्या. नवलसिंग याचा घोडा पडला. पाय उतारे निघाला. आपले लोक राजियाच्या हातीपावेतों मारीत गेले. रजपूत पळों लागले. ऐसें च्यार पांच घटिका युध बहुत उत्तम होऊन रजपूत सिकंदे करून थंडे केले. त्याजकडील सेदडिसे ठार चांगले चांगले लोक जाले. च्यार पाचसे जखमी जाले. खत पडले. तेथून संध्याकाळपावेतों मुडदे नेऊ दिल्हे नाहींत. संध्याकाळी सांगून पाठवून मुडदे त्याजकडून नेविले. रजपूत जुंज पाहून बेहिमत जाले. त्याच्या लष्करांत रुपयाचे सरे पीठ. वैरण फाटेतो बहुत दुरभिक्ष. ऐसा चहूकडून आपल्या फौजा त्याजला जकड़ून उभे केले. रोज त्याचें कूच होऊन अदकोस अगाडीची पछाडी होणें संकट त्याजला जालें. सावे सातवे रोजी मौजे बगरास येऊन गावाच्या आसरियानें राजियाचा मुकाम जाला. भोंवताले आपली चौफेरें फौज रात्रंदिवस राहून रसद वैरण फाटे याजविण बहुत त्यांजला संकट जालें. परजन्य, चिखोल, भक्षावयास नाहीं. नित्य त्याची घोडी, उंटें, माणसें बहुत मरो लागली. फिरून युध करावें तरी आपणास दउडवितात, याजपुढें निभाव होत नाही, ऐसी सिकस्त खाऊन रा॥ रायकेशोराम सलुखाबदल आह्माकडे पाठविले. बहुत रदबदल करून ठराव केला. बुंदीचें राज्य सोडून उमेदसिंगास घ्यावें. एकूण बुंदी सोडून खालीं करोन घ्यावी. रा॥ माधोसिंग याचे च्यारी परगणे निखालस करोन ठाणीं खाली करून घ्यावी. ऐसा करार राजेईश्वरसिंग यांनी कबूल केला. काबूंत बहुत आले होते. जें करतो ते होते. परंतु राज्य राखावें ऐसे जाणून दोन्ही कामें कबूल करवून आजी श्रावण वद्य द्वादसीस त्याच्या आमच्या भेटी जाल्या. याउपरि कराराप्रमाणें कार्य निर्गम करून कूच दो चौ रोजांनीं होईल. येथील