[ ५८० ]
श्री.
पु॥ राजश्री दादा स्वामीचे सेवेसी :-
विनंति उपरि. राजश्री बहिरजी बावा वगैरेस खिलत वस्त्रें देऊन शिष्टाचार केलियावर कितेक भाषणें स्नेहाचे दृढतेचीं समयोचित केली व सर्वीस रुकसत केलें. तेथून बाहिर आल्यावर अनुपगीराने वजिरास सांगितले की, एकले बाळाजी गोविंद अर्ज करू इच्छितात. तेव्हां त्यासच बोलावून घेतले. ते आमच्या मार्गे च्यार घटका होते. त्याचा तपसील पंत मा।रानें लिहिलाच असेल. ये गोष्टीनें नवाबास व जनांतइतकेंच भासलें की सरदारांतच चित्तशुध्धता नाहीं, एकोपा येथेंच दिसतो, हे हिंदुस्थानी आहेत, विपर्यास इच्छितात. सेवकास तर कांहीं दुसरा विचार नाहीं, मुख्य धन्याचे कामावर चित्त आहे. आह्मीं आपल्याकडून दुसरा प्रकार न केला व न करूं. जर ते आह्मास सलाहमध्यें ठेवितील तर दरबारास जातेसमयीं बोलावितील तर जाऊं. आह्मी जावें व त्यांनी तेथच्याच प्रकारें जाणविल्यास योग्य नाहीं. आपणास कळावें ह्मणून लिहिलें असे. हा मजकूर न लिहावा. परंतु रांगड्याचे चित्तांत दुसरा भाव होतो यास्तव सूचनार्थ लिहिलें असे. मुख्य हेंच की रोहिलियाचें परिपत्य करावें. एका सरदारांनी इकडून श्रीगंगा उतरून यावें व दोघा सरदारांनी तिकडून श्रीगंगा उतरून शत्रुचें पारपत्य करावें. वजिराचे बोलण्यांत हे भासलें कीं, पहिलें तर कोणास उपद्रव न करावा, केल्यास क्रोड रुपयेही मिळाले तर न घ्यावे, व त्यांस खारीजच करावे, कामास प्रवर्तल्यावर क... टाकून गेल्यास जिवासी गांठ पडेल. याप्रों। वजीरांनी भाषणे केली. पुढें होईल तें लिहूं.