[ ५५० ]
श्रीवरद.
श्रीमंत राजश्री महाराजे बापूसो। व ता। रा॥ राजेराव दादासाहेब स्वामीचे सेवेसी:--
विनंति सेवक. बाबूराव गोपाळ कृतानेक सां। नमस्कार विज्ञापना येथील कुशल माहाराजांचे कृपावलोकनेंकरून ता। छ ३ रजब सोम्यवासर पावेतों किले फतेनगर येथें यथास्थित असे. विशेष. कृपाळू होऊन स्वहस्ताक्षरीं आज्ञापत्री गौरविलें; तेणेंकरून परमाल्हाद होउन चित्तास लक्षगुणी दृढता जाली. महाराजांचे प्रताप शादलखानाची कथा काय ? अंतरवेदींतून मारून बाहेर काढून देतों. इसलियाखानांस अविलंबे रवाना करावें. दिवस हंगामाचे. जातात. त्याजपाशींहि जमाव भारी आहे. आणखीहि ठेवीत होता. सांप्रत शादलखान दीड हजार स्वारप्यादे जमावानिसी शिकंदरियांत दाखच जाला. दुंदेखान व जमालखान वगैरे सिदोनियांत आहेत. विनाझुंज ठाणीं सिदानें जखेडें वगैरे सोडून कवाविसदार निघोन गेले. एक दिवस दम धरून राहाते तर सेवकहि जाऊन पोहोचला असता. अतःपरहि मारून काढणें बादडामध्यें माझेंच ठाणें मजबुत. एक हजार प्यादा व च्यारसे स्वार कंपकसरे आहेत; हरकारे लावून ठेविले आहेत. शिकंदरियाहून शादल निघाला ह्मणजे मार्गीच गाठून हरवजेनें शिक्षा करितों. जिजाला व बाण अविलंबे पावत तें करणार स्वामी समर्थ आहेत. कृपा केली पाहिजे. हे विज्ञप्ति.