[ ५४९ ]
तनखा होता त्यांचा अंमल मुरळीत चालोन पैका वसूल व्हावा याकरितां केशोरामाबराबरी येथून राऊत दिल्हे. येरव्ही पेरो जाब देत धामधूम करावी, या विचारें राऊत दिल्हे, व केशोराव आमचा आहे असा अर्थ नाही. प्रस्तुत तेथून राऊत आणविले असेत. केशोरामास बरतरफ करून दुसरा अमील पाठवयाची नवाबाची मर्जी असिल्यास बेहत्तर असे. येविसी आमचा आग्रह नाहीं तुह्मी जाबसाल केलाच आहे. पुढेंही प्रसंगोचित् या अन्वये + + + + करणें. परगणे कोळ अंबोळी याचा मजकुर तरी :-- परगणे मजकुर खालशाची जागा तेथें उपसर्ग करावा, फतेअल्लीस बाहेर काढून घ्यावेसें काय होते ? यथार्थच आहे त्याप्रमाणें आह्माकडे कोळेविशी कांहीं अंतर आहे ऐसें नाहीं. बाहादरसिंग घसेडेवाले यास हरदू परगणियाची सनद व खलत नवाबबहादर याजकडून आली, त्याचा अमल बसवावा यास्तव येथून फौज कांहीं देऊन, मशारनिलेचा अंमल चालता केला. त्यांत कांहीं आह्मी लाभलोभ धरून स्वकार्य साधिलें, असा अर्थ नाहीं. प्रस्तुत इकडील फौज बलाविली आहे, लौकरच यईल. नवाबकुदसियाचे जागिरीचा मजकूर पूर्वी तुह्मी लिहिल्यावरून, पेशजीच कृष्णाजीपंत निसबत् राजश्री नरनिंगराव यांस सांगणें तें सांगितलेंच आहे. रा। छ १५ जिल्काद, हे विनंति.
लेखनसीमा.