[ ५४७ ]
श्री.
श्रियासह चिरंजीव रा॥ राजेराव दामोदर माहादेव यासी प्रति बापूजी माहादेव कृतानेक आशीर्वाद उपरि येथील कुशल जाणून स्वकीय लिहिणें. विशेष. या दिवसांत हसंनाचा करोड तगीर होते. त्यासी, येविसी वजिरास अर्जी व जलालुद्दीखानास व मल्हप अशक यांजला रुके लिहिले आहेत. त्यासी, त्यांची मरजी अशी आहे. येथें निशा पक्का करून तुह्मांस लिहून पाठवूं. त्यासी, हें काम वजीर जर पाहाडखाच्या हातानें करतात असें असलें, तरी पक्कें करून, पक्कें केलियावरी नाव घ्यावें. पहिलें नाव न घ्यावें. जे हसंन देत असिले त्याहून अधिक इजाफा ठरेल तो कबूल करावा. जर वजीर कबूल करितील तर दुनिया आपल्यास दुआ देईल. बहुत काय लिहिणें ! हे आशीर्वाद.
रा। त्र्यंबकपंत यास नमस्कार विनंति उपरि हें काम जरूर करणें हे विनंति.