[ ५४५ ]
श्री.
आशीर्वाद उपरि. तुह्मी लिहिलें जे, ज्यानअन्वरखानाचे रुपयाची वाट काय ? व त्याजवर ज्याजती होय तें करणें. त्यासी, सुरतसिंगास वाट करणें असतें तर, आह्मी काशास माणसें पाठवितों ? ऐसें असतां दिलवाडसिंग त्याचाच पक्ष करूं ह्मणत असतील तरी, पांच साता हजाराचा मुकदमा अगरवालास दिलवाडसिंगास देणें अशक्य आहे ऐसें नाही. त्यांणी द्यावे अथवा त्यांचे शिफारशीवांचून हात उचलावा. तुह्मी विना वाटेवांचून गोष्ट सहसा ऐकूं नका. ह्मणिजे झक् मारून बाट करील. हे आशीर्वाद.