[ ५४५ ]
श्री.
पौ। छ ८ सफर.
श्रियासह चिरंजीव राजश्री दादा व नाना यांसीः--
बापूजी माहादेव अनेक आशीर्वाद उपरि येथील कुशल जाणून स्वकुशल लिहिणें. विशेष. तुह्मां उभयतांची पत्रें, जबाबी कासीदासमागमें, व अजुरदाराबरोबर, पैदरपै आलीं तें पावून वाचोन, चित्त हर्षयुक्त होवून, लिहिलें वर्तमान कळो आलें. हजुररांत वजीर अजमाही लिहिलें जे, हा मुलुख तमाम पातशाही सोडविला आहे; याकडे थोडेसे हजरत जिलसुभाजी गुंतवनें होतील. तर, या मुलुकांत तमाम पातशाही अमल होईल. मल्हारराव तर सर्व प्रकारें पातशाही बंदा जाहाला आहे. जयाजी तर मुतलखनामुराद आहे. त्यास, पठाणास तर खारीज केलें आहे. अतः पर मुलुक हात करावा इत्का मात्र बाकी आहे. हाहि मुलुक हातास येऊन अबदालियाचे पारपत्यास त्यांस पुढें करून आह्मीं चालूं, ह्मणजे, हजरतनी शहरदाखल व्हावें. त्यावरून यांणीं उत्तर लिहिलें जे, पठाणरोहिले अद्यापि नेस्तनाबूत जाले नाहीत, त्यांस नेस्तनाबूत करावें ; आपल्या सुब्याचा बंदोबस्त उत्तमप्रकारें करावा; अबदालियाकडे आह्मीं सांगून पाठविलें; तो माघारें फिरून जाईल तर उत्तम ; नाहीं तर, एक मोईनुन्मुलुक पारपात्य करील; आह्मी त्याचें साहित्य करूं; व तुह्मी त्याची तिलतुल्य चिंता न करावी. यारीतीनें त्यांस लिहिलें. व आह्मांस एकांती बोलावून सांगितले जे, आह्मांस उभयती सरदारांचा बहुत भरंवसा होता. त्यांत जयाप्पाचा तर विशेष होता जे, हे कौलाचे सत्य असतील. दक्षणचे नीच मनुष्यांतहि कौलाचे सत्य असतात. यांचे घरीं पठाणाचा लेक आला असतां व यांणीं गंगाजल दरमियान दिल्हें असतां, यांनी नवालरायाहून विशेष केली. बल्की, पंतप्रधानावर हर्फ आणिला. आह्मांस वजिराचेच हातून कामें घेणी असतील तर जे समयीं हे वजीर जाले में सलाबतखां मीरबक्षी जाले, ते समयीं हे माझे यतशखानियांत यांणी येऊन यांणी ह्मटलें जे, दुरानियाचे दौलतीचे तीन हिसे करावे. एक तुमचा ह्मणजे नवाब बाहादुराचा, एक माझा, व सलाबतखानाचा, ऐसे तीन हिसे करून यास बरतफ करावें. तेव्हां म्यां ह्मटलें जे, तुह्मी शिवाय पंतप्रधानाचें काम कोण्हीही न करावें. पंतप्रधानांहीं काय नासरजंग, व माहाबतजंग, ईश्वरसिंग, अभयसिंग, मोईनुन्मुलुक, इतनामुदौले, फेरोजंग यांचे विचाराखेरीज कांहींच न करावे. जे गोष्ट करावी ते पातशाहाचे दौलतखाहीसाठी करावी; त्यांतच तुमची आमची सर्वांची खैरत असे; व तुमची वजारत कायम असे. त्यास, वजीर तो थोडासा शाहाणा, तो उगाच राहिला. सादखा बोलिले जे, आह्मी तर उद्याच चढून जाऊं. आह्मी उत्तर दिल्हें जे, बिसमिला पातशाहाचे मस्तक दुरानियाबराबर आहे. हें सलाबतखानास सांगितले, व वजीर अजमास सांगितले जे, तुह्मी उद्या दरबारास येऊं नका. त्यावरून ते दरबारास आले नाहीत. सलाबतखा खपीप जाले. सफदरजंग आपले घरी बसून ह्मणों लागले जे, आह्मी अबदालियास बोलावितों. आह्मी ह्मटलें जे, ते वेळेस एक्या अबदालियास मारिलें होतें ; आतां तुह्मी व अबदाली एक होणें ; उभयथांसहि मारिलें जाईल. त्यावरून स्तब्ध राहून, कमरूदिखानाच्या व असफज्याहाच्या जागिरा वाटून घेतल्या. त्यावरून पातशाहाचे चित्तामध्ये किंतु येऊन जुलफुकारजंगासहि खराब केलें, व यांसहि एक्या फौजदारीसाठीं खराब केलें. याकरितां मल्हारबांहीं येऊन त्यांचे साहित्य केलें; ह्मणून पातशाहाजवळ पंत प्रधानाकडील लटिकवाद आला; ह्मणून पंतप्रधानासी दक्षणेत खटखट लागली. त्यास सलाबतजंग सिफला त्यासी बराबरी करणें लागली. या गोष्टी सरदारांसी करून, पातशाहासी कौल अहद यांचे विद्यमानें पंतप्रधानासी करीन ह्मटल्यास कौल अहद हे करतील. ह्मणजे जाणावें जे, हे बैमानीस आलेसें जाणावें. याकरितां यांचा तो आह्मांस किमपि विश्वास नाही. वजिराची प्रमाणिकता ह्मणावी तर, ज्यांणी यासाठी इतका प्रेत्न केला, त्यांजवरहि हात पडला तर चुकणार नाही. त्यास, आह्मी पाठ ठोकूं तर, हात हाकावयासी चुकणार नाहींत. परंतु, आह्मासी व पंतप्रधानासी कौल अहद आहे. याकरितां, आह्मांस दुसरी गोष्ट करणें नाहीं; व आमचा दिल्हेला, मुलुक यास मिळतो. यास पराक्रम केलासा वाटत असेल तर, बाविसां. सुभियांमधें एक अकबराबादची सुभेदारी; त्यांत एक लाभोजची फौजदारी; तेथें एक्या रांडेस मारिलें, तर काय झांट उखडली ? त्यास सरदारांहीं आपले काम करून वाराणसी घ्यावी, बैमानीचा मार्ग न धरावा. जेणेंकडून बेहबुद होय तेच गोष्ट करावी. अशा कितेका प्रकारें गोष्टी सांगितल्या व येथें तजविजा अनेका प्रकारें करितात. हें कांहींच ध्यानास न येतां, वजीर अजम जाणतात जे, खोज्या मजकडे जाला हेंच मोठें आश्चर्य वाटतें ! जानोजी निंबाळकरांनी पत्र दिल्हें होतें, तें नवाब बहादुरांहीं, मजजवळ द्यावें ह्मणून, लछमीनारायणाजवळ दिल्हें. ते आमचे स्नेही असतां त्यांणी तेथें पत्र पाठविलें तर काय पशमं उखडलीं ? पंतप्रधानासी जाबसाल बोला बोला ह्मटलें, त्यास, नवाबबहादुरांहीं मसी बहुता प्रकारें ह्मटलें जे, सुभेदारीची नियाबत सलाबतजंगास देवा. त्यास फेरोजंग कबूल न करी. व आह्मी सुभेदार ज्यास ह्मटलें त्याखेरीज दुसर्यास सुभेदार ह्मणणार नाहीं. ऐसे ह्मटले ह्मणून, लछमीनारायण व दुसर्यांहीं शुकवा लिहिला असिला तर वीस फर्मान ज्यास ह्मणाल, त्यास देऊं. थोडक्याच गोष्टीवर फुलजी व्हावेंसें काय आहे ? आह्मी येथें बसलों तरी सरदारांकरितां वजिराचीच चाकरी केली. व पठाणांसहि कोणे फिरविले, हे इनसाफ करतील तर, आमचाच मुभा होईल. सरदारांचा भ्रम असिल्यास हजुरांत आमचें स्वरूप व खाविंदाची चाकरी याकरितां आह्मीं ईश्वराप्त शाहिद ठेवून कर्तव्यार्थ तो करितों. त्याचा तदारूक सरदारांहीं व वजिरांहीं दुसरा वकील पाठवूं ह्मणून श्रीमंतास लिहिलें. त्यास; वजिराजवळ जे वकील आहेत. त्यांचे कबिल्यास दिल्लीमध्यें राहावयास जागा नाहीं. मगर वजिरावर तफजुल होतो तो श्रीमंतांचेच खातरदास्त होतो. जर त्यांचीच *