[ ५४३ ]
पण पातशाहाकडीलगुंता उरकून घ्यावयासी आलेत. आह्मी समयास सेवेसी असावें, निकाल पडावा, यासी उचत तें सुचवावें. त्यास येथें वजिराचें मनोधारण रक्षून सेवेसीं आलें पाहिजे यास्तव, येलचखान तेथें वजिराकडील आले आहेत, त्यांस समक्ष ताकीद करून, वजिरास लिहून, आह्मांस सेवेसी बोलावून घेणें. आपल्यापासीं पावल्यावर, सरकार कामाचा निकाल पाडावयची तदबर नेमिली आहे तें श्रुत करून, श्रीकृपेनें व श्रीमंताचे प्रतापें यश घेऊन श्रीमंतापाशी जाणें होय, आह्मींहि समागमेंच येऊं, तो विचार बनेल तो सुदिन करावा ! पत्र लिहितां नये, यास्तव समक्षच येऊन विनंति करूं. आपण तेथले प्रसंगास सर्वजाण आहां. सूचनार्थ विनंति लिहिली जाती की, आपले कानीं जे जे मजकूर श्रवण कराल. ते सत्य जाणावे. विशेष विस्तार लिहितां न ये. आमचे एकनिष्ठतेचा मजकूर * + + +