[ ५४२ ]
श्री.
पौ। छ २६ रा॥खर.
श्रियासह चिरंजीव राजश्री दादा व नाना याप्रति बापूजी माहादेव अनेक आशीर्वाद उपरि येथील कुशल जाणून स्वक्षेम लिहिणें. विशेष. मोतीलाल साहुकार याचें द्रव्य सुरजमलजीकडे, येविशी तीर्थरूप बावांनीं तुह्मांस रोबरो सांगितलेंच आहे. ऐसें असतां सांप्रत सर्व त्रिकुट एकत्र जालें आहे. ऐसा योग पुनरोक्त घडणें कळतच आहे. या समयांत याचें द्रव्य प्राप्त होय ऐसा विचार करावा. पुढें सुरजमलजी देतील हें कळतच आहे ! याजकरितां मशारनिले तुह्मांपासी पाठविले आहेत. उभयतां सुभेदाराचे रोबरो याविसीं ताकीद करून यास रुपये प्राप्त होय, तें करावें. येविसी विशेष ल्याहावेंसें काय आहे ? याचें काम होवून तीर्थरूपांजवळीं सुरुखुरु होय तें लिहिणें. बहुत काय लिहिणें ? हे आशीर्वाद.