[ ५४१ ]
श्री. पौ छ १८ माहे जा।खर.
श्रियासह चिरंजीव राजश्री दादा प्रति बापूजी माहादेव कृतानेक आशीर्वाद उपरि येथील कुशल ता। छ १५ माहे जमादिलावर मुकाम इंद्रप्रस्थ जाणून स्वकीय कुशल लिहिणें. विशेष. राजश्री अंताजीपंती अकबर महमूद यासी व पातशाहासी कलह लाऊन गेले. सांप्रत्य जुमामहजदीजवळ लडाई वख्तारखानासी व अकबत महमूदखानासी लढाई मोठी जाली. वख्तावरखानाचा मोर्चा जुमामहजदीजवळ बसला आहे. बादकची याचा मोर्चा खाले बसला आहे. प्रागदास याच्या कचेरीस अगबद महमदास लाख रुपये शिक्का पाडून कड लाविली. तोफ सुटलियावरून अकबत महमद सरकला. महाटेहि सरकले. अंताजीपंतांनी मराठ्यांसही जिवाळा धरावा कीं + ++ धरले. अतःपर श्रीवाराणशीस धरलें. अंताजीपंतापासून प्रांत उचलावा. बक्षीस विदित जेः अकबत महमदापासून प्रांत उचलावा. शुके खास लाविले. अलमचा आला तो पाठविला असे, त्यावरून कळेल. बहुत काय लिहिणें ? हे आशीर्वाद.