[ ५३८ ]
श्री.
छ २३ रबिलाखर.
मौजे गुरवली पा। तालगांव तेथ फौज आहे. त्यास, आपले देसवारीचे गाव कोसांवर आहेत तेथील रबी पाचा साता गावींची तर एकंदर कापून नेली. वरकड गावींची सतेंपोतें रोज नेत आहेत. या फौजेनें पांचा सात हजारांची खराबी केली. तुह्मी हजुरचीं पत्रें पाठविली ते त्यांस दिधली; परंतु, तेथ त्यांचे लोक मानीत नाहींत. रोज रबी चारतात. कितीक रोज मुक्काम होईल न कळे. दुसरेः–वजीराच्या नावा येऊन बाईपूर पा। कनोज तेथ येऊन राहिल्या आहेत. पूल बांधू ऐसें ह्मणत आहेत. याजकरितां तमाम परगना बेदील झाला आहे. रबी रानांमध्ये आहे. जर लष्कर वजिराचें इकडे उतरलें तर पैसा बुडाला. यांजकरितां, सेवेसी विनंति लिहिली जाती की, वजीरास सांगून, नावा बाईपुरीहून पुढे जाय ऐसें केलें पाहिजे, ह्मणजे उत्तम आहे. तर, आपण खामखाय वजीराचें पत्र नावडियासी पाठविलें पाहिजे. रा॥ शिवरामपंत लग्नास येथ आले आहेत. त्यांजला आपण सांगितले की, स्वार माहदूबापासी आहेत, ते आह्माजवळ ठीवनं. त्यांनी सांगितले की, स्वार सात आठ आहेत; त्यास, आपणांपासीही पाहिजेत. कासीपंत वगैरे तिघे त्यांनी ठीऊन घेतले. सा स्वार आमच्या येथ ठीवीले आहेत. येथही स्वारांवेगळी तहसील तलब होत नाही. आपण लिहिलें की मामाकडे पाठवनें. त्यास, पांचा साता येत खात आहे. बद्दल, अगोधर याच(ची) काय तजवीज करणें ते केली पाहिजे. बहुत काय लिहिणें ? हे विनंति. *