[ ५३५ ]
श्री.
पौ छ ३० रबिलाखर.
श्रीमंत राजश्री दामोधरपंतदादा व राजश्री पुरुशोत्तमपंतनाना - स्वामीचे सेवेसी:---
सेवक धोंडो दत्तात्रेय कृतानेक सां। नमस्कार विनंति येथील क्षेम ता। छ २९ माहे रबिलाखर मु॥ शिंगी रामपूर सुस्वरूप जाणून स्वानंद लेखन करीत असिलें पाहिजे. विशेष. आपण बहुतां दिवसीं पत्र पाठविलें तें उत्तम समईं प्रविष्ट होऊन परम संतोष जाहले. ऐसेंच निरंतर पत्र पाठवून सांभाळ केला पाहिजे. यानंतर आपण स्वारांविसीं लिहिलें. त्यास, राजश्री गोविंद बल्लाळ यमुनापारीहून अंतरवेदींत येणार. यास्तव त्यांकडे आमचे स्वार पांचसातें गेले आहेत. त्यास मशारनिल्हेचे यांचे आगमन कितीकां दिवसां होईल तें पाहावें. नाहीतरी स्वार पाठविले असते. जें आपलें कार्य तें आमचेंच आहे. आह्मी आपले आज्ञवितरित नाहीं. विशेष काय लिहावें ? राजश्री गोविंदपंत आल्यानंतर स्वार पाठवून देऊं. बहुत काय लिहिणें ? लोभ असो दीजे. हे विनंति.