[ ५३४ ]
श्री.
पौ छ २३ रबिलाखर.
श्रीमंत महाराज राजश्री दादावता। राजश्री नाना स्वामीचे सेवेसीः--
सो। नरहर शामराज सा। नमस्कार विनंति उपार येथील क्षेम ता। छ २० माहे रविलावर पावेतों स्वामींच्या कृपेकरून प्रा। कनोनांत सुखरुप असो. विशेष. तुह्मीं पत्न. पाठविलें तें छ १८ रोजी पाऊन परम समाधान जालें. लिहिलें की पार ठाणें बसविलें. त्यास कदीमी कनोजचे गांव असतील तर उत्तम, नाही तर नाहक, खटखट आहे. ऐशियांस, आपण कानगोहे, याजपासी तहकीक केलें आहे की, गांव कनोजचे आहेत; पेशजी अमल केला आहे; दरमीयान दहापांच वरश जाला नाही. आपले वाजवी गांव आहेत हें जाणोन ठाणें वसविलें आहे. पूर्वीही आपली आज्ञा होती. याजकरितां केलें आहे. तेथील जमीदार दोघेजण आपणापासीं येऊन ठाणें घेऊन गेले आहेत. कानगाहे यांनी हकीकत लिहिली आहे त्याजवरून विदित होईल. उपर रा। गोविंदपंत याची फौज तीरावावलोहे मढईवर एक माहना होती. तेथें राहून बाहद बारा गांवींची रबी कापून नेली. आतां ( पुढें गहाळ ).