[ ५३३ ]
श्री.
छ ३० रबिलाखर.
महाराजांचे सेवेसी नरहर शामराज साष्टांग नमस्कार विनंति उपरि. तरकारी वांगी शेर ॥- व भाजी पंधरा शेर, व गुलाबांची फुलें १००० हजार एक, ऐशी सेवेसी पाठविलीं असेत. दुसरें ; सरंजामाची याद पाठविली त्यांत लि॥ की, दोन जीन तयार करून पाठविणें. त्यासी, जीन कैसें करावे ? दक्षिणी करावें किंवा टांकण घोड्यास मोगली करावे ? हे तपशील लिहला पाहिजे. वरकड सरंजाम तयार होत आहे. दुसरें आपले येणें इकडे कधीं होणार ? तें लिहिलें पाहिजे. नावा तयार राजघाटीं आणून ठेवल्या आहेत. आह्मी भेटास यावें हा हेत आहे तर आज्ञापत्री लिहिलें पाहिजे. बहुत काय लिहिणें ? दुमच्या व गाशे वगैरे टांकट घोड्यास पाहिजे. त्याचा तपसील लहान मोठे कसें करावें तें लि॥ पाहिजे.A