[ ५०४ ]
श्री.
चिरंजीव राजश्री आपा यासी. पिलाजी जाधवराऊ आशीर्वाद येथील क्षेम छ २३ मोहरम मुकाम नजिक अकोलें यथास्थित असे. यानंतर: नवाबाची मर्जी आहे की, जैसा स्नेह चालतो, तैसा त्यांनी रक्षावा. मुद्दे घालून जाहागीर मागतात, ते न द्यावी. भेटीहून प्रयोजन नाहीं. नासरजंग याची गर्मी. त्याहिबरी आह्मी भेटीस येतोंच. वाळादेहून माहुराकडे आले, यामुळें लौकिक विपर्यास जाहाला. तथापि आह्मी येथें धीर धरून राहिलों, याणे उत्तम जालें. श्रीमंतांनीहि फौजेची वोढ पडावी ह्मणून कूच करून, गंगा उतरून, गेले, उत्तम जाहालें. तुह्मी जलदीनें स्वार होऊन खावंदास सामील होणें. आह्मांस बोलावितील तेव्हां येऊन भेटी होतील. तुह्मी जलदीनें लांबलाब मजली करून जाऊन पोचणें. तुह्मांस खर्चास महालकरियासी येथून लिहिलें आहे. येसाजी गाइकवाड याचे राऊत आह्मांबराबर होते, त्यांतून पाचजण पाठविले. दाहा हजार रुपये तुह्मांस खर्चास देविले ते घेऊन येतील. कदाचित मुकाम जाले तरी भादळीजवळ होतील. तेथें आह्मी येऊन पोचतों. तुह्मांस खर्चास लागलें तरी, रसदेपौ। अगर दरएक ऐवजीं महालकरियांपासून राऊत पाठवून आणवणें. बहुत काय लिहिण ? हें आशीर्वाद.
(मोर्तब सुद.)