[ ५०१ ]
श्री
राजश्रियाविराजित राजमान्य रा॥ त्रिंबकराव नाना स्वामीचे सेवेसीः--
पो। बळवंतराव नागनाथ सा। नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशललेखन करीत जावें. विशेष. बहुत दिवस जाले; पत्र येऊन वर्तमान कळत नव्हतें. तेणेंकरून परम चित्तास चिंता लागली होती की, आपली कृपा आह्मांवर असून या समयीं सगळेंच आमचें विस्मरण पडलें. तों अकस्मात अमृततुल्य स्वदस्तुरचेंच पत्र पाठविलें; त्यांत घरोब्याचे रुईनें बहुत प्रकारें लिहिलें. त्यांस, नाना, आमचा व आपले स्नेह कसा आहे ? वडिलाचिर्त. व सध्या हालिया जमान्यांतहि आपणहि कृपा कसी करीत होते ? तें ह्या समयांत कोणींकडेस जाऊन फुकाचा नमस्कारहि कधी आला नाहीं ! श्रीमंत वसईचे मु॥ असतां बहुत पत्रें आपलीं आलीं ; व, त्यांच्या रवानग्याहि बहुत जाल्या ! त्यासमयीं मी आपला असतां माझ्याच हातें जाल्या. आह्मीहि आश्चिर्य करूं !! परंतु दैवयोगें गोष्ट दिवसेदिवस विस्मृतीखालीच येत गेली. त्याहिमध्यें सध्यां कांही आमचे उर्जिताचे दिवस कीं, आपणांस आमचें स्मरण जालें !!! त्यास बहुत उत्तम गोष्ट चांगली जाली !!! श्रीमंत यजमानस्वामीचें आज्ञापत्र सादर जालें आहे, त्यावरून सर्व मजकूर कळेल. त्याप्रों। वर्तणुकेंत यावे. रा। छ २४ मोहरम. बहुत काय लिहिणें ? लोभ सदोदित वृद्धिंगत होत जावा. हे विनंति.