[ ४९८ ]
श्री.
पु॥ श्रीमंत राजश्री
सुभेदार साहेबाचे सेवेसी:-
विनंति उपरि. शाहाकडील व शाहावल्लीखानाकडील वर्तमानः याकूबअलीखानाची दोस्तीचा विचार पूर्वी विस्तारें सो। लिहिलें होतें, त्यावरून श्रुत जालें असेल. हालिज्याहनखा, त्याचा सरदार, अटक नदीवर आला. येथें नदी उतरोन गुजरातेस आला असेल; अथवा येईल. शाहा पिसोरास आला. दरकूच लाहोरास येणार आहे. जेव्हां तो लाहोरास येऊन बसेल, तेव्हां येथील उमराव लहानमोठे सर्व त्यापाशीं जाऊन इतफाक पहिल्याप्रों। करतील. त्यास, आजवर शाहावल्लीखानाची मर्जी या गोष्टीवर राखिली होती की, श्रीमंताशिवाय शाहासी एकोपा करावा; आणि, येथील लहानमोठे यास एकीकडे करावें. फिरूनही शाहावल्लीखानानीं याकूबअल्लीखानास ताकीद लिहिली कीं, तुह्मी श्रीमंत सुबेदारापाशी जाऊन, ज्यांत त्यांची खुषी, व जगताचे बरें होय ते गोष्ट करणें. त्यास, गोसावियाकडील कोण्ही उत्तर त्याचे मुद्दे माफीक न आलें. आतां या दिवसांत फिरून त्याचा शोध रायावयाचा जाला आहे. यासाठीं याकुबअल्लीखानांनी सलाह सांगितली आहे कीं, तुह्मीं श्रीमंतांकडे त्वरेनें लिहून पाठविणें की, आजपावेतों खैरखाही आपले मकदुरपावेतों केली; आतांही जे त्याची मर्जी असली तर, परस्परें एकोपियाची गोष्ट मातपकी करावयासी हजीर आहों. खानमा।र ह्मणतात कीं, आज्ञा होईल तर मीच येईन ; नाहींतर, पूर्वी श्रीमंतांनी वस्ती वगैरे पाठविली, ते फिरून माघारे गेली, ते येथें पाठवून द्यावी. व जैसी जैसी त्यासी पोत्खगी करून घेणें, हदहदूद बांधणें, व परस्परें मित्रत्व होय कीं, त्यांचे मुलुकास आपली फौज कार्य पडलिया बोलावीत, व आपल्यास पाहिजे तर, आपण बोलाऊन घ्यावी. लहानमोठे हिंदुस्थानचे अमीर सरदार पातशाहासुद्धां, यांस कळलें कीं, उभयपक्षी एकोपा पुर्ता जाला, ह्मणजे हेही सर्व दबतील. व मुलुख याचे हाताखालें दबला आहे तो सुटेल. मग इकडे ज्याचें ज्याचे पारपत्य एकएकाचें निरनिराळें करावें. याप्रो। खानमारांनी सांगितलें तें सो। लिहिलें असे. उत्तरीं सनाथ करणार साहेब समर्थ आहेत.