[ ४९४ ]
श्रीवरद.
श्रीमंत राजश्री सुबेदार साहेब गोसावी यासीः--
छ स्नो। पुरुषोत्तम महादेव कृतानेक आशीर्वाद विनंति उपरि येथील कुशल ता। छ २७ माहे जिल्हेज मुक्काम नजिक जैपूर तीस कोस लष्कर पातशाहा जाणोन स्वानंदलेखन करावयास आज्ञा केली पाहिजे. विशेष. इकडील सविस्वर वृत्त, पूर्वी लिहिली त्यांवरून श्रुत जालें असेल. हालीं नजबखान अलवरेस मोर्चे लावायास दोन कोसांवर अलवरेहून आहेत. राजश्री बापूजी होळकर यास पूवी जागीर व नगदी देणें करार करून अनुपगीर गोसावीयाचे विचारें प्रतापसिंगास बुडविलें. त्या नगदीचे दोन लाखांपैकी दीड बाकी राहिले. ते जैपुरावर वरात देऊन, गोसावी मजकुरासमागमें देऊन, रवाना केले ते उभयतां सरदार जैपुराहून तिसा कोसांवर पावले. ज्यागीर नगदी नजबखान देईल तेव्हां लिहूं. पातशाहहि जैपुरास जातात, राजे सर्व एकत्र करून पातशाहीचा बंदोबस्त करावा मनांत. आपण जलदीनें यावें व आमची चाकरी पहावी. तूर्त बापूजी होळकर यांस पातशाहाचे तैनातीस करावें करावें - कीं आपली बाजी शेर राहे. आह्मांस येथें पाठवून आमची कुमक पत्रापत्रींही न केली. ऐसें न करावें. तूर्त इकडे फौज आहे हेंहि लगामी नाहीं. कृपा करून, रविसंक्रमणाचे तिलशर्करा पाठविले आहेत, हे स्वीकारून पत्रामृतीं जीवनोपाय करणार
आपण समर्थ आहेत. * आतांच वृत्त आलें कीं, नजबखानानें अलवरेस फौज ठेऊन, दरकुच जैपुरास येतो. पुढें होईल ते विनंति लिहूं, कृपा केली पाहिजे. हे विनंति.