[ ४९३ ]
श्री.
पौ। छ ३० रजब
० श्री ँ
ह्माळसाकांत चरणी तत्पर
खंडोजीसुत मल्हारजी होळकर
राजश्री पुरुषोत्तम महादेव गोसावी यासीः--
छ अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो मलारजी होळकर दंडवत विनंति उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय लेखन करीत असावें. विशेष. तुह्मीं पत्र पाठविलें तें पावलें. दुदेखान वगैरे रोहिले निघाले. पारीहून कूच करून, गणमुक्तेश्वराचे रोखें जाऊन, शेरपूरचे घाटास पूल बांधोन, अलीकडे उतरून, परीक्षतगडास यावें; तेथून मेरट जवळ आहे; ह्मणून लिहिलें तें सर्व विदित जालें. ऐसियासी, त्यांची बातनी पक्की राखून, तुह्मी आपले जागां सावध राहून, आह्मांस लिहून पाठवणें. त्यासारिखें कुमकेची तजवीज केली जाईल. खरी बातमी राखून वरचेवर पैदरपै लिहित जाणे. * र॥ छ २६ रजब. बहुत काय लिहिणें ? हे विनंति
श्री
मोर्तब
सुद