[ ४९१ ]
श्री.
राजश्री दामोदरपंत गोसावी यासीः--
स्नो जयाजी सिंदे दंडवत विनंति उपरि. राजश्री बाजीराव राजे घोरपडे यांस नबाबाचे दोन इनायतनोम तुह्मीच घेऊन दिल्हे; त्याजवरून राजे मजकूर जमावसुद्धां आले. त्यांच्या आमच्या भेटी छ ३० जिल्कादी जाहाल्या. सामान उत्तम आहे; व मागाहूनही लोक यावयाचे राहिले आहेत तेहि येत आहेत. तरी, तुह्मी नवाबास सांगून, एक भला माणूस पालखीनिवास पुढें पाठवून राजे मजकूर यांसी घेऊन जाणें; आणि नवाबाची भेट उत्तम प्रकारें करवावी, बहुमान करवावा, व ज्यागिरा बाहाल करव्याव्या. हे अगत्यरूप करावें लागतें. याजकरितां राजश्री नागोराम पाठविले आहेत. हे सविस्तर सांगतील. सारांश गोष्ट की, हें काम चित्तावर धरून अगत्यरूप केलें पाहिजे. तुमच्या भरोशावर आह्मी बेफिकीर आहों. वरकड श्रीमंतांकडील पत्रें आलीं तीच बजिन्नस तुह्मांकडे पाठविलीं आहेत. त्याप्रमाणें कागद वगैरे कितेक कामें आहेत ती करून पाठविणें. तुह्मी पुढें आलां असिलां तरी राजश्री त्रिंबकपंतास चिट्ठी लेहून देणें. हे विनंति.
श्री
मोर्तब
सुद