[ ४९० ]
श्री.
राजश्री बापूजी महादेव व दामोदर महादेव गोसावी यासीः--
स्नो। जयाजी सिंदे दंडवत विनंति उपर. परगणे चांभारगोंदे येथील गांव सरकार अलीची ज्यागीर आहे; ते गांव आपले वतनी आहेत; व आपल्या लोकांच्या पाटिलक्या आहेत. ते खराब पडले आहेत, आह्मांकडे जाल्यानंतर आह्मांस उपयोगी आहेत. यास्तव राजश्री बाबूराव चिंतामण तुह्मांपाशी पाठविले आहेत. याजपाशीं गांवची याददास्त आहे. मशारनिल्हे गांवचे तनख्यास वाकफ आहेत, सदरहू गांव यादीप्रमाणें आह्मांकडे ज्यागीर करून घेऊन सनदा मशारनिलेबराबर पाठवून देणें. जरूर जाणून लिहिले असे. तर, अगत्यरूप यादीप्रमाणें गांव ज्यागीर करून घेऊन सनदा पाठविणें, छ २० साबान, हे विनंति.
श्री
मोर्तब
सुद.