[ ४८९ ]
श्री.
पौ। छ ८ मोहरम.
राजश्री दामोदर माहादेव गोसावी यासीः--
छ अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य-- स्नो। मलारजी होळकर दंडवत विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहित जाणें विशेष. तुह्मीं पत्र पाठविलें तें पावोन वृत्तांत कळों आला. नवाब वजीर यांणी पुसिलें की, बाहिरमृद्धां कोठपावेतों जावें ? अथवा बाहिर कोठें ठिकाणीं ठेवावीं ? वरकड इसमालखान, राय रामनारायण वगैरे पुढें पाठविले ते पोचले असतील. भेटी कोणे दिवशी व्हावी याचा विचार मनास आणून उत्तर पाठवावें ह्मणून लिहिलें. त्यासि, नबाबांहीं बाहिरसुद्धां पुलापरियंत यावें. राजश्री जयाजी आपा, व चिरंजीव राजश्री खंडेराव, राजश्री गंगाधरपंत, फौजसुद्धां पुलापासून समीपच आहेत. पठाण तो रामगंगेच्या पार आहेत; त्यांचा कांहीं वसवास न धरावा. उत्तम प्रकारें थंडा केला आहे, त्याचा हिसाब नाहीं. पुलापुढें आपल्या फौजा आहेत. याउपर दिवसगत लागली तरी पठाण तेथूनहि निघोन जाईल. ऐसा त्याचा मतलब दिसतो. याकरितां नवाबास सांगून कूच करून बाहिरसुद्धां जलदीनें पुलापरियंत येत. येथें आलिया त्यांच्या आमच्या भेटीनंतर जो विचार कर्तव्य तो करून. रामगंगेस पायावा सापडला तरी उतरोन, अगर पूल बांधोन, रामगंगा उतरोन पठाणांस उत्तमप्रकारें नतिजा पाविला जाईल. याकामास दिसगत लावायासी कार्याचें नाहीं. नवाब जलदीनें आलें ह्मणून जो विचार करणें तो शीघ्र करून शत्रूस नतिजा होईल. येविसी आपांनीं व चिरंजीवांनी उत्तरें लिहिली असत. नवाबास शीघ्र घेऊन येणें. छ ७ मोहरम. बहुत काय लिहिणें ? हे विनंति. ( मोर्तबसुद )
श्रीह्माळसाकांत
चरणीं तत्पर, खंडोजीसुत
मल्हारजी होळकर.