[ ४८७ ]
श्री
राजश्री दामोधर माहादेव गोसावी यांसिः--
स्नो। मल्हारजी होळकर दंडवत विनंति उपरि बाबू न्याहालचंद यांचा गुमास्ता जवाहिरमल्ल त्याजपासून खासगत ऐवज येणें. त्यास या धामधुमेमुळें शहरांतून ऐवज येऊं पावत नाही. याजकरितां हे पत्र तुह्मांस लिहिलें आहे. तरी जवाहिरमल्ल ऐवज रवाना करतील. त्यासमागमें तुह्मी आपली माणसे व स्वार विश्वासूक देऊन तुह्मी आपलें. नांवे करून ऐवज काढून आणून सुरक्षित आह्मांपासीं पोहचतें करणें. येथें. खर्चाची वोढ बहुत आहे. याजकीरतां निकटीनें लिहिलें असे. रा। छ॥ १२ सफर. बहुत काय लिहिणें ? हे विनंति.
मोर्तबसुद.
पै॥ छ १२ सफर.