[ ४६६ ]
श्री
पौ। छ २५ रजब.
राजश्री पुरुषोत्तम महादेव गोसावी यासी :-
छ अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो।
मल्हारजी होळकर दंडवत विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत जाणें. तुह्मीं पत्र पाठविलें तें पावोन सकल अर्थ ध्यानास आला. राजश्री नारोपंत व आपाजीपंत गंगापारीहून आलीं, तीं सेवेसी पाठविलीं आहेत. पावतील. मिरापुराकडील जेथें आहे, ती तेथें आहे. धामधूम असल्यास करून जातात; आमचे वादियाची बंदोबस्ती सर्व यथास्थितच आहे; ह्मणोन कितेक अर्थ पत्र दर्शविले, ते सर्व कळले. ऐशास, उभयता पंत-मा।निल्हेकडे कासीद पाठवून, तिकडील बातमी ठीक आणून, लिहित जावी. तुह्मीही मिरापुरच फौजेची बातमी पैदरपै आणून, ठाणियांत बहुत सावधपणें असत जाणें. रा। छ २४ रजब बहुत काय लिहिणें ? हें विनंति.
( मोर्तबसुद )
श्री
ह्माळसाकांत चरणी तत्पर
खंडोजीसुत मल्हारजी
होळकर.